नवी दिल्ली : राज्यसभेत (Rajyasabha) गुरुवारी बेरोजगारीवर सत्ताधारी पक्ष आणि विरोधकांमध्ये शाब्दिक वाद झाले आहेत. त्यावेळी भाजपा खासदार (BJP MP) केजे अल्फोन्स (KJ Alphonse) यांनी यामध्ये भाग घेत उद्योगपतींमुळे रोजगार मिळत आहे, त्यांची पूजा करा असे व्यक्तव्य केले आहे.

देशातील बेरोजगारीवर नुकतीच संसदेत केंद्र सरकारकडून (Central Government) माहिती देण्यात आली. गेल्या तीन वर्षांत सुमारे १० हजार लोकांनी बेरोजगारीमुळे आत्महत्या केल्या आहेत.

ही माहिती संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात एका प्रश्नाच्या उत्तरात केंद्रीय गृहमंत्रालयाने दिली आहे. यामुळे विरोधी पक्षाच्या खासदारांनी बेरोजगारीच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

Advertisement

या शाब्दिक वादामध्ये भाजपा खासदार केजे अल्फोन्स यांनी भाग घेत हे ‘तुम्ही माझ्यावर भांडवलदारांचे मुखपत्र असल्याचा आरोप करू शकता.

मी अशा लोकांची नावे घेतो ज्यांनी या देशात नोकऱ्या निर्माण केल्या आहेत, कारण तुम्ही सुद्धा त्या लोकांची नावेही घेतली आहेत वक्तव्य केले आहे.

यामध्ये ते म्हणाले की रिलायन्स (Reliance) असो, अंबानी (Ambani) असो, अदानी (Adani) असो, कोणीही असो, त्यांची पूजा केली पाहिजे. कारण त्यातून रोजगाराच्या संधी निर्माण होतात.

Advertisement

हे लोक पैसे गुंतवतात, मग ते अंबानी असोत की अदानी, या देशात पैसा कमावणारा प्रत्येक उद्योगपती रोजगार निर्माण करतो. त्यांनी रोजगाराच्या संधी निर्माण केल्या आहेत. त्यामुळे त्यांचा आदर करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

तसेच पुढे त्यांनी सांगितले की ‘जागतिक असमानता ही वस्तुस्थिती आहे. दोन जणांच्या संपत्तीत वाढ झाल्याचे विरोधी पक्षाचे म्हणणे आहे. एलॉन मस्कच्या संपत्तीत १०१६ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

तुम्हाला याची जाणीव होती का? गुगलचे संस्थापक लॅरी पेज यांच्या संपत्तीतही १२६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. बेझोस यांच्या संपत्तीतही ६७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. या सर्व टॉप १० मध्ये बिल गेट्स सर्वात खालच्या क्रमांकावर आहेत. त्यांची संपत्ती केवळ ३० टक्क्यांनी वाढली आहे.

Advertisement