जादा पैसे असले, की ते अधिक पैसे कमविण्याची हाव सुटत नाही. वैध मार्गाने पैसे कमवायला कुणाचीही हरकत नाही; परंतु पैशाला पैसे जोडण्यासाठी अवैध मार्गाचा मोह सुटत नाही.

त्यातून लेखक आणि दिग्दर्शकही सुटलेले नाहीत. अशीच खासगी सावकारी करणा-या एका लेखक, दिग्दर्शकाला पोलिसांनी अटक केली.

जनसंपर्क अधिका-यालाच लुटले

अवैधरित्या सावकारी करणाऱ्या दिग्दर्शक व नाट्य लेखकाला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. त्यामुळे मोठी खळबळ माजली आहे.

Advertisement

त्याने रावेतमधील खासगी रुग्णालयात जनसंपर्क अधिकारी म्हणून काम करणाऱ्या तरुणाकडून व्याजापोटी लाखो रुपये घेतले आहेत.

खंडणी विरोधी पथक दोनने अटक केली आहे. शंतनू वसंत पांडे (वय 45, रा. वारजे) असे अटक केलेल्या या दिग्दर्शक व नाट्य लेखकाचे नाव आहे. याबाबत रविराज साबळे तक्रार दिली आहे.

आजारासाठी घेतले कर्ज

तक्रारदार रावेतमधील खासगी रुग्णालयात पीआरओ म्हणून गेल्या सहा वर्षापासून काम करतात. त्यांना व त्यांच्या पत्नीला आजार झाला होता.

Advertisement

त्यांना महिना 28 हजार रुपये खर्च येत होता. त्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती बिकट होती. त्यांना पैश्यांची आवश्यकता असल्याने त्यांनी 2018 मध्ये मित्राकडे पैसे मागितले.

सांगवी येथील एका मित्राने त्यांना शंतनू पांडे हा व्याजाने पैसे देत असल्याचे सांगितले. त्यानुसार त्यांनी पांडे याची भेट घेतली.

व्याजासह पैसे देऊनही पुन्हा मागितले मुद्दलापेक्षा जास्त पैसे

पांडे पैसे देण्यास तयार झाला. त्यानंतर हमी करारनामा करत हात उसने म्हणून 6 लाख रुपये 5 टक्के व्याजाने पैसे दिले होते.

Advertisement

त्या बदल्यात फिर्यादी यांनी त्याला व्याज व मुद्दल असे 7 लाख 40 हजार रुपये दिले होते, तरीही तो फिर्यादी यांच्याकडे 7 लाख 20 हजार रुपये देण्यासाठी मागत होता.

तसेच त्याने पैसे न दिल्यास शिवीगाळ करत व कुटुंबाला त्रास देईल असे धमक्या देत. दररोज दोन हजार रुपये द्यावे लागतील अशा धमक्या देत होता.

पांडेला अटक

याबाबत रविराज यांनी खंडणी विरोधी पथकाकडे तक्रार केली होती. त्यानुसार पथकाने गुन्हा दाखल करत पांडे याला अटक केली आहे.

Advertisement

या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे, याची माहिती घेतली जात असल्याचे सांगण्यात आले आहे.

पांडे याचे हिंदी चित्रपट दिग्दर्शक व नाट्य लेखक असल्याचे प्रोफाइल आहे. त्याबाबत अधिक माहिती घेतली जात असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

 

Advertisement