पुणे – पुण्यात (Pune) सध्या गुन्हेगारीचं (Crime Rate) प्रमाणात मोठ्या संख्येनं वाढत असून, अनेक तरुण मुलं या गुन्हेगारीच्या जाळ्यात (Crime Rate) अडकत चालायचं दिसून येत आहे. आणि याच कारणामुळे शहरात दिवसागणतीत अनेक लहान-मोठे गुन्हे घटना दिसून येतात. नुकतंच शहरातील येरवडा परिसरात एक मोठी घटना घडली असून, या घटनेमुळे एकच खळबळ निर्माण झाली आहे. पूर्ववैमनस्यातून दोघांचा खून केल्याची धक्कादायक घटना शहरातील येरवडा (Yerawada) परिसरात घडली आहे. शनिवारी मध्यरात्री ही घटना घडली आहे.

येरवडा (Yerawada) परिसरातील शंकर चव्हाण यांच्यावर केलेल्या गोळीबाराचा बदला घेण्यासाठी 8 ते 10 जणांच्या टोळ्याने दोघा सराईत गुन्हेगारांवर (Crime Rate) शस्त्राने वार करून त्यांची हत्या केली आहे.

दोघेही सराईत गुन्हेगार असून याप्रकरणी येरवडा (Yerawada) पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिल ऊर्फ पोपट वाल्हेकर आणि सुभाष ऊर्फ किसन राठोड अशी खून (Crime Rate) झालेल्या व्यक्तींची नावे आहेत.

ही घटना येरवड्यातील (Yerawada) लक्ष्मीनगरमधील पांडु लमाण वस्तीतील नगरसेविका श्वेता चव्हाण यांच्या कार्यालयाबाहेर शनिवारी पहाटे तीन वाजता घडली.

पोलिसांच्या माहितीनुसार, येरवड्यातील पांडू लमाण वस्ती येथे वाल्हेकर व राठोड आले होते. त्यावेळी त्यांच्यात पूर्व वैमनस्यातून वाद झाले. त्याच्यावर एकमेकांवर तलवारीने वार करण्यात आले.

अनिल वाल्हेकर, सुभाष राठोड व आणखी एक त्यांचा साथीदार शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास मोटारसायकलवरुन येरवडा परिसरातून जात होते. त्यावेळी 8 ते 10 जणांच्या टोळक्याने त्यांना वाटेत अडवले. त्यांच्यावर सपासप वार केले या घटनेत दोघेही गंभीर जखमी झाले.

त्यावेळी त्यांचा तिसरा साथीदार हा घाबरून पळून गेल्याने बचावला गेला आहे. दरम्यान, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारा पूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

ही घटना समजल्यानंतर तातडीने वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. खून झालेले मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयामध्ये पाठवले.

याप्रकरणी आरोपींवर येरवडा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी संशयित आरोपींचा येरवडा पोलिसांनी शोध सुरू केला आहे.