पुणे – खूनाचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी च्या खूनांमध्ये पुण्यातील येरवडा कारागृहात (yerwada jail) असलेल्या कैद्यांमध्ये जोरदार हाणामारी (Crime) झाली. ही भांडणे सोडविण्यासाठी गेलेल्या कारागृह (Yerwada Police Station) हवालदाराला या कैद्यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या घटनेमुळे संपूर्ण कारागृहात एकच खळबळ उडाली असून, सध्या कारागृहात (Yerwada Police Station) सध्या तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. सोमवारी सकाळी 8 वाजता कैद्याच्या भांडणाची (Crime) सुरुवात झाली होती.

याबाबत पोलीस हवालदार हनुमंत मोरे यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार येरवडा कारागृहातील हॉस्पिटल यार्डमधील बॅरेक बाहेर सोमवारी सकाळी 8 वाजता घडला.

त्यानुसार समीर शकील शेख, तंरग राकेश परदेशी, निलेश श्रीकांत गायकवाड, पुरुषोत्तम राजेंद्र वीर, देवा नानासो जाधव अशी गुन्हा दाखल केलेल्या न्यायालयीन कैद्यांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी 8 वाजता कैद्याच्या भांडणाची सुरुवात झाली. त्यावेळी समीर शकील शेख, तंरग राकेश परदेशी, निलेश श्रीकांत गायकवाड, पुरुषोत्तम राजेंद्र वीर, देवा नानासो जाधव या सगळ्यांनी बंद खोलीतील कैद्यांच्या दिशेने फरशी आणि दगडाचे तुकडे फेकून मारत होते.

हा सगळा प्रकार तक्रारदार हवालदार आणि कारागृहातील (Yerwada Police Station) काही कर्मचारी आपलं कर्तव्य बजावत होते. या सगळ्यांनी हा प्रकार आटोक्यात आणण्याचा आणि थांबवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी कैद्यांनी हवालदाराला हातापायांनी मारहाण केली.

हा सगळा प्रकार घडत असताना पुरुषोत्तम वीर आणि देवा जाधव यांनी त्यांना मारहाण करण्यास प्रोत्साहन दिल्याने त्यांच्यावरही सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या पाचही जणांवर वेगवेगळ्या कलमांनुसार गुन्हा दाखल आहेत. तरंग परदेशी हा नवी खडकी येथील गुंड असून त्याच्यावर तरुणावर तलवारीने वार करुन खुनाचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

तर पुरुषोत्तम वीर आणि त्याच्या साथीदारांनी मांजरी परिसरात दरोडा टाकला होता. त्यांचा दरोडा आणि इतर गुन्ह्यांमध्ये सहभाग असल्याचे पोलीस तपासात उघड झाले होते. फरशी आणि दगडाच्या तुकड्यांनी ही मारहाण करण्यात आली होती.