मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे सतत १९ बंगल्याबाबत बोलत होते. त्यामुळे मला या १९ बंगल्यांचे डॉक्युमेन्ट द्यावे लागले आहेत. असा खोचक टोला भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी लगावला आहे.

किरीट सोमय्या यांनी मीडियाशी (Media) संवाद साधताना म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांचे १९ बंगले हरवले आहेत. रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांनी जानेवारी २०१९ पत्र लिहून माझ्या नावावर बंगले करा असे सांगितले होते.

ते बंगले मी दाखवणार नाही. तुम्ही तिथे बंगले आहेत हे कायदेशीररित्या प्रुव्ह केले. मी तिथे बघायला गेलो. मला बंगले सापडले नाही. त्याबद्दल मी तक्रार केली आहे.

Advertisement

त्यामुळे या बंगल्याबाबत ठाकरे कुटुंबांनी बोलावे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि शिवसेना नेते रवींद्र वायकर या बंगल्याबाबत का बोलत नाहीत? संजय राऊतच (sanjay raut) या बंगल्यांबाबत का बोलत आहेत? असा सवाल सोमय्या यांनी केला आहे.

तसेच त्या १९ बंगल्याच्या प्रकरणात रश्मी वहिनींचे नाव आहे, म्हणून आम्ही पुढे जाणार नाही. परंतु १९ बंगले त्यांनी कशाला मध्ये आणले. त्यामुळे मला सगळे डॉक्युमेन्ट द्यावे लागलेत, असे सोमय्या म्हणाले.

तसेच हजारो कोविड (Covid) पेशंटचा बळी घेणाऱ्यांवर ठाकरे का बोलत नाही? कोविड घोटाळ्याच्या माझ्या प्रश्नांना का उत्तर देत नाहीत? असेही सोमय्या म्हणाले आहेत.

Advertisement