सामान्य ग्राहकांकडून वीजचोरी कमी आणि मोठ्यांकडून जास्त होते, असं जे म्हणतात, ते खोटं नाही.
राज्यातील उद्योजकांकडून मोठ्या प्रमाणात वीज चोरी होत असल्याचे महावितरणकडून वारंवार सांगण्यात येतं. सामान्य ग्राहकांवर कारवाई करणारे मोठ्या ग्राहकांवर कारवाई करण्याचे धाडस दाखवित नाही.
उद्योजकाकडून निवासी इमारतीत वीज चोरी
कल्याणमधील प्रसिद्ध उद्योजक संजय गायकवाड यांच्या विरोधात वीज वितरण कंपनीने वीज चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.
कल्याण पूर्व येथील एका इमारतीमध्ये वीज चोरीच्या आरोप त्यांचावर आहे. गायकवाड यांनी आठ कोटी रुपये किंमतीची रोल्स रॉईस कार विकत घेतल्याने ते चर्चेत आले होते.
पोलिस ठाण्यात तक्रार
कल्याण पूर्व भागातील एका इमारतीत अनधिकृतपणे वीज पुरवठा सुरू असल्याची माहिती महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना मिळाली होती.
काही दिवसांपूर्वी वीज वितरण कंपनीचे अभियंता अशोक दुधे यांनी या इमारतीची पाहणी केली. या इमारतीत अनधिकृतपणे वीज पुरवठा सुरू असल्याचे आढळून आले.
याबाबत 30 जूनला दुधे यांनी महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात तक्रार दिली. जवळपास 34 हजार 640 रुपये वीज चोरी झाल्याचे या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
गायकवाड यांची भूमिका काय ?
गायकवाड यांनी आपली भूमिका मांडली. “माझ्यावर लावण्यात आलेले आरोप चुकीचे आहेत. जी काही दंडात्मक कारवाई आहे. ती भरली जाईल. पूढील प्रक्रिया केली जाणार आहे”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.