मुंबई – बॉलिवूडचा दबंग अभिनेता ‘सलमान खान’ (Salman Khan) बऱ्याच दिवसांपासून मोठ्या पडद्यावर दिसलेला नाही, तरीही तो अनेकदा चर्चेत असतो. कधी त्याच्या चित्रपटाच्या शूटिंगमुळे तर कधी इतर कारणांमुळे तो सतत चर्चेत राहतो. नुकतीच अशी माहिती समोर आली असून, त्यानंतर तो (Salman Khan) पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.

खरंतर ही बातमी बिग बॉसची (Big Boss 16) आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सलमानने (Salman Khan) बिग बॉसच्या पुढील (Big Boss 16) सीझनसाठी त्याची फी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

यावेळी सलमान (Salman Khan) शोसाठी मोठी रक्कम घेऊ शकतो, असा दावा सूत्रांनी केला आहे. तुम्हाला सांगतो की, करोना महामारीमुळे सलमानला आधी फीमध्ये तडजोड करावी लागली होती,

पण आता सर्व काही रुळावर आल्याने सलमाननेही मानधन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी सलमानला बिग बॉसच्या 16व्या (Big Boss 16) सीझनसाठी 1050 कोटी मिळू शकतात.

मात्र, अद्याप याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. सूत्रांची ही बातमी खरी ठरली तर सलमान फीच्या बाबतीत नवा विक्रम करेल.

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, सलमान खान शेवटचा ‘अंतिम’ चित्रपटात दिसला होता. या चित्रपटात त्याच्यासोबत आयुष शर्मा दिसला होता.

दरम्यान, आगामी चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर, सलमान लवकरच ‘कभी ईद कभी दिवाळी’मध्ये दिसणार आहे. याशिवाय यशराज बॅनरच्या ‘टायगर 3’ या चित्रपटातही तो जबरदस्त अॅक्शन करताना दिसणार आहे.