Punelive24.com
Latest News, Videos, Web Stories and Photos from Pune

गांजा तस्करी प्रकरणी तरुण गजाआड

गांजा बाळगल्याप्रकरणी महाळुंगे पोलिसांनी तरुणाला बेड्या ठोकल्या. पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील कुरुळी येथे ही कारवाई करण्यात आली. त्याच्याकडून आठ किलो 154 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला आहे.

सापळा रचून अटक

तात्या मदन काळे असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. कुरूळी गावातील ज्ञानराज मंगल कार्यालयाजवळ तात्या मदन काळे गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती महाळुंगे पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून आरोपी तात्या काळेला ताब्यात घेतले.

एक लाख 69 हजारांचा मुद्देमाल

आरोपीकडे असलेल्या बॅगची तपासणी केली असता त्यामध्ये आठ किलो 154 ग्रॅम वजनाचा गांजा आढळून आला. पोलिसांनी गांजा आणि इतर साहित्य असा एकूण एक लाख 69 हजार 80 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

Advertisement

नागपुरात कारच्या सीटखालून गांजा तस्करी

नागपूर ग्रामीण पोलिसांनी चंद्रपूर- नागपूर रस्त्यावर सापळा रचून गांजा तस्करी करणाऱ्यांना काही दिवसांपूर्वी पकडलं होतं.

एका कारमधून उत्तर प्रदेशमधील आरोपी गांजा तस्करी करत असल्याचं समोर आलं आहे. कारच्या सीटखाली आणि डिक्कीच्या खालच्या भागात गांजा लपवून ठेवण्यात आला होता.

35 पॅकेटमध्ये 69 किलो 500 ग्राम गांजा सापडला आहे. जवळपास 6 लाख 95 हजार रुपये किमतीच्या गांजाची तस्करी केली जात होती. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली.

Advertisement

वाशीममध्ये घरातून गांजा जप्त

वाशीम शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालयाजवळ विरलहूजी नगरमधील घरकुलात अवैध रित्या गांजा साठवून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला होता.

या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा व शहर पोलिसांनी कारवाई केली. पोलिसांच्या या कारवाईत एकूण 15 किलो गांजा जप्त करण्यात आला असून एका महिलेला अटक करण्यात आले आहे.

 

Advertisement
Leave a comment