मुरगूड : आकांक्षा तानाजी सातवेकर (वय १९) या युवतीला सोशल मीडियाच्या माध्यमातून एक शिक्षक सतत लग्न करण्याची मागणी करत होता. या त्रासाला कंटाळून या तरुणीने आत्महत्त्या केली आहे.

यातील संशयित आरोपी अमित भीमराव कुंभार हा शिक्षक असून वारंवार तरुणीला त्रास देत होता. तसेच गेल्या महिना दीड महिन्यापासून तो वेगवेगळे संदेश ही पाठवायचा. लग्नासाठी होकार दिलासा तर मी माझी बायको मुलांना सोडून तुझ्या बरोबर लग्न करण्यास तयार होईन असे धमकीचे संदेश तो पाठवत होता.

ही घटना अर्जुनवाडा तालुका कागल येथील असून या तरुणीने २२ जानेवारीला राहत्या घरी विष प्राशन केले होते. तिला उपचारासाठी कोल्हापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, उपचार सुरू असतानाच तिचा मृत्यू झाला.

Advertisement

या तरुणीने उपचारादरम्यात दिलेल्या जबाबानुसार पोलीसांनी अमित कुंभार याला अटक केली आहे.