काँग्रेसची ही वैचारिक परंपरा संपत चालल्याची खंत माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केली. आपल्या शब्दाला पक्षात पूर्वीइतकी किंमत उरली आहे किंवा नाही, अशी साशंकताही त्यांनी बोलून दाखविली.

भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांच्या उपस्थितीत शिंदे यांनी हे वक्तव्य केल्यानं उपस्थितांच्या भुवया उंचावल्या.

पक्षाच्या सद्यस्थितीविषयी खंत

काँग्रेसचे प्रवक्ते डॉ. रत्नाकर महाजन यांच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमासाठी शिंदे आज इंदापूरमध्ये आले होते.

Advertisement

शिंदे यांनी पक्षाच्या सद्यस्थितीविषयी खंत व्यक्त केल्याने राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या आहेत. 1974-75 च्या काळात काँग्रेसची वैचारिक शिबिरे भरवली जात होती.

त्यामध्ये चुकीच्या धोरणांमध्ये सुधारणा केली जात असे; मात्र सध्या तसे घडताना दिसत नाही. आम्ही नक्की कुठे आहोत, हे पाहणे अवघड झाले आहे.

रोख कुणाकडे ?

गेल्या काही दिवसांपासून राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर काँग्रेसमध्ये अनेक अंतर्गत घडामोडी सुरू आहेत. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाला पक्षातील अनेक ज्येष्ठ नेत्यांचा विरोध आहे.

Advertisement

पक्षातील 23 ज्येष्ठ नेत्यांनी काँग्रेसमध्ये संघटनात्मक बदल करण्याची गरज व्यक्त केली होती, तर दुसरीकडे राज्य पातळीवर महाविकास आघाडी सरकारमध्ये असलेल्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वबळाची भाषा सुरू केली आहे.

त्यामुळे महाविकास आघाडी सरकार अस्थिर होण्याची चिन्हे आहेत. या पार्श्वभूमीवर शिंदे यांच्या वक्तव्याचा रोख नक्की कोणत्या दिशेने होता, याविषयी सध्या राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत.

Advertisement