Punelive24.com
Latest News, Videos, Web Stories and Photos from Pune

जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना मिळणार घरबसल्या शिक्षण

कोरोनाच्या काळात आॅलाईन शिक्षण अपरिहार्य झाले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी शहरी भागाच्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत कमी पडतात. या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा परिषदेने अतिशय स्तुत्य निर्णय घेतला आहे.

नवे ई-लर्निंग ॲप विकसित

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अत्याधुनिक पद्धतीच्या ऑनलाइन शिक्षणाची सोय व्हावी, या उद्देशाने जिल्हा परिषदेने इन्फोसिस कंपनीच्या सहकार्याने नवे ई-लर्निंग ॲप विकसित करण्यात आले आहे. या ॲपचे काम अंतिम टप्प्यात आले असून येत्या आठवडाभरात ते कार्यान्वित होईल.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी विविध शैक्षणिक अभ्यासक्रमांबाबतच्या संशोधनांचा अभ्यास करून स्वतः या ॲपची रचना केली.

Advertisement

या ॲपमुळे ग्रामीण विद्यार्थ्यांना केंद्र व राज्य सरकारने वर्गनिहाय उपलब्ध करून दिलेला आणि जिल्हा परिषदेने तयार केलेला अभ्यासक्रम ऑनलाइन उपलब्ध होईल.

त्यामुळे कोरोनाकाळात शिक्षणापासून दुरावण्याची शक्यता असलेल्या ग्रामीण विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

शिष्यवृत्ती परीक्षेच्या तारखेत बदल

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष तुकाराम तुपे यांनी राज्यातील पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षेची तारीख बदलली असल्याची माहिती दिली आहे.

Advertisement

आता शिष्यवृत्ती परीक्षा 9 ऑगस्टला आयोजित केली जाईल. 8 ऑगस्ट ला राज्यात केंद्रीय पोलिस बलाची परीक्षा होत असल्याने परीक्षा पुढे ढकलली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने इयत्ता पाचवी व आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा लांबणीवर टाकली होती.

 

Advertisement
Leave a comment